एपीएमसी बद्दल

नियमित केलेल्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा/कर्जतची महाराष्ट्र शासनाची अधिसुचना क्र.ए.पी.एम.सी./ एस./4/कर्जत दि. 13 ऑगस्ट 1960 अन्वये संपुर्ण श्रीगोंदा व कर्जत या दोन तालुक्यासाठी एकच बाजार समितीची स्थापना झाली व प्रत्यक्षात कामकाज दिनांक 21 नोव्हेंबर 1966 ला सुरु झाले तदनंतर मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांचेकडील नोटीफिकेशन क्रमांक ए/एसकेटी/डी.आय.व्ही./ऑफ 198 दिनांक 12 सप्टेंबर 1984 नुसार विभाजन करण्यात आले. श्रीगोंदा व कर्जत या दोन तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समित्यांची स्थापना झाली असुन संपुर्ण श्रीगोंदा तालुका बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.